Wednesday, February 21, 2007

आता सगळीच गणितं चुकली आहेत......

आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,
आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहे
माहीत आहे की तु येणार नाहीस,
तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे

पहाटेचा उत्साह आता राहीला नाही,
संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाही
सगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयं
कळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं

सकाळची गुलाबी थंडी, संध्याकाळची सोनेरी किरणे,
पक्षांची किलबिल आणि पावसातला गारवा
सगळं काही कुठेतरी हरवलं आहे,
निर्सगही जणु माझ्याबरोबर तिलाच शोधत आहे

माझे कुठं चुकले आता काहीच कळत नाही,
अनुत्तरीत प्रश्नाची उत्तरं शोधुनही सापडत नाहीत
म्हणुन पुन्हा नव्याने सगळी गणितं तपासत आहे ,
पण छे आता सगळीच गणितं चुकली आहेत.....

No comments: