Wednesday, February 21, 2007

श्रावण........

श्रावण........ रिमझीम धारांचा, कोसळणा-या सरींचा
श्रावण........ थंड वा-याचा, डोंगरावरच्या ढगांचा
श्रावण........ लोभस इंद्रधनुष्याचा, ऊन पावसाच्या लपंडावाचा
श्रावण........ नव्या हिरवाईचा, झुळूझुळू वाहणा-या ओढयांचा
श्रावण........ नाचणा-या मोरांचा, पानांमधुन लाजणा-या फुलांचा
श्रावण........ उत्स्फुर्त गीतांमधला, निर्सगाच्या उत्सवाचा
श्रावण........ माझ्या मनातला, तिच्या गोड आठवणींचा...........................

No comments: