Tuesday, February 27, 2007

सुकलेली फुलं

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात

माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

नाते तुझे हळुवार जपायचे,

नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?

मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडयामनाला कोन समजावयाचे,?
सागं आठवण आली की काय करायचे,?
तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सागं आठवण आली की काय करायचे,

नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?

फोन मात्र मीच करायचं,
H.....R... U मत्र तू बोलायचे,
तु दिसला की डोळे भरुण पहायचे,
ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?

विसरत चाललोय सारे

विसरत चाललोय सारे
धुसर ज़ाल्यात आठवणी!

विसरत चललोय तुज़ा चेहरा,
तुज़े हसणे,तुज़े बोलणे,
आणि मनात घर केलेली
तुज़्या गालावरची अवखळ खळी!

विसरत चाललोय् तो पहिला पाउस
ओलेती तु,
आणि माज़्या डोळ्यातले भाव् पाहुन
तुला फुटलेले हसू!

विसरत चललोय तुज़े कळेभोर डोळे,
त्यातील अल्लड भाव
आणि ते पाहुन
भरकटलेली माज़्या मनाची नाव!विसरत चललोय ते वाळुचे बन्गले,
सहजीवनाची गोण्डस स्वप्ने,
आणि माज़्या स्वप्नान्चे
उध्वस्त इमले!

विसरत चाललोय माज़्या हातातून सुटलेला तुज़ा हात,
माज़े पणावलेले डोळे,
आणि रडू आवरत
हसत अलविदा म्हणण्याचा
तुज़ा वेडा अट्टहास!

सभोवतालच्या ओळखीच्या चेहऱ्यात अनोळखीही असतात काही

सभोवतालच्या ओळखीच्या चेहऱ्यात अनोळखीही असतात काही

डोळे जरी फ़सले तरी मन कधीच फ़सत नाही....

आपणच पटववून देत असतो अनोळखीतील ओळख मनाला,

दिवस उलटले की आपण, पून्हा एकदा ओळखतो स्वत:ला....

अगदी जवळचे चेहरेही कधी कधी ओळख हरवून बसतात,

काही गोष्टी मात्र चेहरे नसूनही खुप ओळखीच्या वाटतात....

धडधडत्या ह्र्दयाला कूठे असतो असा स्वत:चा चेहरा,

पण त्यातील प्रत्येक ठोका असतोच ना आपला...?

कागदावरचे शब्दही हा नियम मोडत नाहीत,

कधी मी त्यांना तर कधी ते मला ओळखत नाहीत

मन ही दुमडता यायला हवं

मन ही दुमडता यायला हवं;
जसं लहानपणी वहीचं पान दुमडायचा॓
अगदी तसंच!
ज॓ण॓ करुन कुणात गुंतल॓ल॓ मन
मग सहज वळवता य॓ईल,
ज्याला जसं पाहीज॓ तसं;
अगदी सहज..
कुणाला ही न दुखवता
कुठलं ही अवघड वळण न घ॓ता!


आठवण तुझी आली की
रात्र सुदधा थांबुन रहात॓
नकळतच मग य॓ऊन पहाट
दारात तात्क्ळत उभी रहात॓....

Wednesday, February 21, 2007

पावसाच्या गोष्टी - ॥१॥

फेटा सारखा करून, खांद्यावर उपरणं टाकत नाम्या खाटेवरून उठला. "जनेS, येतो गं," असं म्हणत बाहेर जायला निघाला. नाम्याची हाक ऐकताच जनी दारी आली. "आवं," डोक्यावरचा पदर सावरत तिने नाम्याला हाक मारली. नाम्याने नुसतीच मान वळवली आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजर रोखली. "लवकर येताय न्हवं....बस्ता बांधाया तालुक्याला जायचयं......लक्षात हाय न्हवं...," जमिनीकडे बघत, हलक्या आवाजात तिने नाम्याला लवकर परतायची आठवण करून दिली. "व्हय व्हय, हाय लक्षात," नाम्या जरा गुरकतच म्हणाला आणि चालू लागला. जनी घरात गेली आणि कामाला लागली, पण त्यात तिचे लक्ष लागेना. नाम्याच्या काळजीने तिचा चेहेरा उतरला...

नाम्याचं डोकं आजकाल ठिकाणावरच नसायचं. तीन वर्ष सतत दुष्काळ आणि गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतात पीक असं काही झालच नव्हतं. शेतीकरता घेतलेलं कर्ज वाढतच चाललं होतं. पावसाच्या-पीकाच्या-कर्जाच्या काळजीने नाम्याला पार पोखरून काढले होते. त्यात यंदा चंपीचं लगीन करायचं होतं. ह्या वर्षीही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे नाम्या अधिकच हताश झाला होता.

"ए बाय....बाहेर अंधारून आलय....ये बघ." चंपीच्या आवाजाने जनीची तंद्री भंग पावली. भानावर येत ती "आले, आलेS," म्हणत उठली. परसदारी चंपी हसत काळ्या ढगांकडे बघत होती. जनी बाहेर येऊन आकाशाकडे बघत, हात जोडून काहीतरी पुटपुटली....मग एक सुस्कारा सोडत स्वतःशीच हसली. "बाय, चल बा कडं शेतावर जाऊ," चंपी उत्साहाने म्हणाली. "चल काहीतरीच," असं म्हणत जनीनं तिला उडवून लावलं. पण चंपीनं लकडाच लावला तेव्हा जनी तयार झाली.

पावसाच्या आत शेतावर पोचता यावं म्हणून दोघी लगबगीनं निघाल्या. सुसाट्याचा वारा सुटला होता; छोटी धुळीची वादळं उठवत होता. आकाशात मोठ्ठाल्ले काळे ढग दाटले होते आणि मधूनच गडगडण्याचा आवाज येत होता. जनी-चंपी शेतात पोचल्यातोच टप्पोरे थेंब पडू लागले. बघता-बघता पावसाचा जोर वाढला. जनी-चंपी खिदळत पळायला लागल्या. पावसाचा जोर आणखी वाढला. मुसंडी मारून पळत त्या जवळच्या आंब्याच्या झाडाच्या आडोशाला पोचल्या. चंपीने चेहेरा पुसायला तोंड वर केले, पण समोरचे दृश्य पाहून ती हबकली. "बाSय" एवढेच ती कशीबशी किंचाळली.

फासावर लोंबकळणाऱ्या नाम्याचा निर्जीव देह पाहून जनी तिथल्या-तिथेच थिजली. तिच्या थिजलेल्या नजरेतून एक नवीन पाऊस सुरु झाला होता आणि तुटलेल्या काळजात एक नवीन वादळ...

मी आभारी आहे तुझा..........

मी आभारी आहे तुझा
माझ्या जीवनात येण्याबद्दल
आणि येउन पुन्हा
एकट्याला सोडून गेल्याबद्दल

मी आभारी आहे तुझा
मला स्वप्नं दाखवल्याबद्दल
स्वप्नातुन परत
वास्तवात आणल्याबद्दल

मी आभारी आहे तुझा
दोन पाउलं बरोबर चालल्याबद्दल
आणि पुढचा प्रवास
अर्धात सोडून गेल्याबद्दल

मी आभारी आहे तुझा
जीवनाच्या होडीला दिशा दिल्याबद्दल
जाता जाता याच होडीला
वादळात सोडून गेल्याबद्दल

बरं झालं तु माझ्याशीच अशी वागलीस
दुस-या कुणीही नसती
इतकी दु:खं पचवली
मी आभारी आहे तुझा
याही गोष्टीसाठी........